esakal | दीराने विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, घाटकोपरमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

दीराने विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, घाटकोपरमधील घटना

दीराने विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, घाटकोपरमधील घटना

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबई (Mumbai) देशातील इतर शहरांच्या तुलनेत सुरक्षित समजली जाते. पण शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर (law & order) प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. कालच मुंबईच्या नवघर (navghar area) परिसरात एक 22 वर्षीय तरुणी गाडीत एकटी असताना (girl alone in car) चाकूच्या धाकावर तिला लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. आता मुंबईच्या घाटकोपर परिसरात एका महिलेवर अ‍ॅसिड हल्ला (Acid attack) झाल्याची घटना घडली आहे. (Acid attack on women in Mumbai ghatkpoar area relative is accused)

शेजाऱ्याच्या दुकानात नोकरी स्वीकारल्याच्या रागातून दीरानेच विधवा वहिनीच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुनीर बशीर घासवालाचाळ, पारशीवाडी या परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. या अ‍ॅसिड हल्ल्यात दुकानमालकाचे हात आणि चेहरा भाजला असून आरोपीने वहिनीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

हेही वाचा: मुंबईत बारपाठोपाठ दुकानदारांकडूनही वसुली? मनसेनं सांगितला 'रेट'

दोन्ही जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. आरोपी आणि तक्रारदार दुकान मालक हे शेजारी राहतात.

हेही वाचा: BMCच्या शिपायांची पत्नीच्या नावे कंपनी; लाटली कोट्यवधींची कामं

तक्रारदार सुदांशु प्रामाणिक यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. पीडित महिला ही विधवा असून तिने नोकरीबाबत विचारल्यानंतर तिला कामावर ठेवले. मात्र याचाच राग अनावर झाल्याने आरोपीने हे कृत्य केले. या प्रकरणी घाटकोपर पोलिस अधिक तपास करत आहेत.

loading image