..'ते' करायचे हे काम; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

रेतीमाफियांच्या वाढलेल्या कारवायांवर सोमवारी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई करून सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला. या कारवाईत जिल्हा प्रशासनाच्या पथकाने ३३० ब्रास रेती जप्त केली. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.

ठाणे : पर्यावरणाचा ऱ्हास वाढल्याने जिल्हा प्रशासनाने रेतीउत्खननास बंदी केली असतानाही ठाणे जिल्ह्यात खाडीत आणि नदीत रेतीमाफियांद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीउत्खनन करण्यात येत होते. रेतीमाफियांच्या या वाढलेल्या कारवायांवर अखेर सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई करून सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला. या कारवाईत जिल्हा प्रशासनाच्या पथकाने ३३० ब्रास रेती जप्त केली. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.

ही बातमी वाचली का? रस्ता सुरक्षेबाबत बेकायदा फलकबाजी

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक कळवा रेतीबंदर, काल्हेर रेतीबंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडीपात्र, टेंभा, तानसा या नदी परिसरात सक्‍शन पंपांच्या साह्याने अवैध रेतीउपसा मोठ्या प्रमाणावर होतो, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, सोमवारी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे तब्बल १६ अधिकारी आणि १६० कर्मचारी यांच्या पथकाने भिवंडी, ठाणे, कल्याण, कशेळी खाडीत अवैध रेतीउत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली.

ही बातमी वाचली का? वसईत विद्यार्थ्यांना गुदमरण्याचे प्रशिक्षण

तसेच, उल्हासनगरमधील उल्हास नदीत, शहापूरमधील टेंभा व तानसा नदीपात्रात, अंबरनाथ येथील नदीतही रेतीउत्खनन करण्यात येत होते. त्या ठिकाणीही धडक कारवाई करून रेतीमाफियांची दाणदाण उडवली. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३४ सक्‍शन पंप, २५ बार्जेस, रेतीसाठा करण्यासाठी वापरात येणारे ५० स्टोरेज टॅंक (हौद) आणि ३३० ब्रास रेती हस्तगत केली. तब्बल साडेसहा कोटींचा (६.४८ कोटी) मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर जेसीबी, गॅसकटर यांच्या साह्याने बोटी, सक्‍शन पंप, बार्जेस आणि स्टोरेज टॅंक घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

ही बातमी वाचली का? शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

सातत्याने कारवाई होणार : जिल्हाधिकारी
अप्पर जिल्हाधिकारी रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसीलदार अधिक पाटील, भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड, कल्याण तहसीलदार दीपक आकडे, शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, अंबरनाथ तहसीलदार जयराज देशमुख, उल्हासनगर तहसीलदार विजय वाकोडे, रेतीगट तहसीलदार मुकेश पाटील, खनिकर्म अधिकारी मनोज मेश्राम आणि अन्य अधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचारी, पोलिस असे १६० जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान, अवैध रेतीउत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली असून सातत्याने अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against illegal sand elicit in Thane district