कृती दलाचे अध्यक्ष-सदस्य असमर्थ! डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली नवीन दल गठीत 

तेजस वाघमारे
Saturday, 17 October 2020

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यापूर्वीचे कृती दल रद्द करून नवीन कृती दल गठीत केले आहे. या दलाचे अध्यक्षपद वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाची उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अंमलबजावणी कशी करावी? याबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृती दलामध्ये काम करण्यास अध्यक्ष डॉ. वसुधा कामत आणि सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यापूर्वीचे कृती दल रद्द करून नवीन कृती दल गठीत केले आहे. या दलाचे अध्यक्षपद वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करण्यास या दलाला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 

पत्रिपुलाचे काम अंतिम टप्प्यात; रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरच पाहणी 

केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुकतेच लागू केले. त्याचा अभ्यास करून याचा अहवाल सादर करण्यासाठी 18 सप्टेंबर 2020 रोजी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्षपद शिक्षण धोरण समितीच्या सदस्य आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांच्याकडे देण्यात आले होते; परंतु कामत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे या गटात काम करण्यास असमर्थता दर्शवली; तर सदस्य म्हणून नियुक्ती झालेले भालचंद्र मुणगेकर यांनीही या दलात काम करण्याबाबत असमर्थ असल्याचे सरकारला कळविले. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नवीन कृती दलाची स्थापना केली असून, संचालक डॉ. धनराज माने यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या दलाच्या बैठका ज्या विद्यापीठांमध्ये होतील, त्या विद्यापीठांनी समितीमधील अशासकीय सदस्यांचे मानधन व प्रवासभत्ता परस्पर अदा करावा, असे निर्देशही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. 

जालना व पुण्यात निकृष्ट कोरोना चाचणी किट्स; पॉझिटीव्ह रेट कमी झाल्याचा दरेकरांचा दावा

18 सदस्यांची नियुक्ती 
1. डॉ. रघुनाथ माशेलकर, (ज्येष्ठ वैज्ञानिक) - अध्यक्ष 
2. डॉ. सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग 
3. डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ 
4. प्रा. शशिकला वंजारी, कुलगुरू, एसएनडीटी महिला विद्यापीठ 
5. डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) 
6. डॉ. राजन वेळुकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ 
7. डॉ. विलास सपकाळ, माजी कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 
8. प्रो. जी. डी. यादव, माजी कुलगुरू, रसायन तंत्रज्ञान संस्था 
9. डॉ. विजय पाटील, कुलपती, डी. वाय. पाटील विद्यापीठ (नवी मुंबई) 
10. निरंजन हिरानंदानी, हैद्राबाद नॅशनल कॉलिजिएट विद्यापीठ, मुंबई कुलाधिकारी 
11. भारत अहुजा, संचालक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, (पुणे) 
12. देवीदास गोल्हार, प्राचार्य, मराठवाडा वाणिज्य महाविद्यालय (पुणे) 
13. मिलिंद साटम, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ 
14. डॉ. अजित जोशी, पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालय 
15. विजय कदम, विश्‍वस्त, शिवविद्या प्रबोधिनी (मुंबई) 
16. डॉ. धनराज माने, समन्वयक, (संचालक- उच्च व तंत्रशिक्षण विभाग) 
17. नितीन पुजार, आंतरराष्ट्रीय सल्लागार, मुंबई 
18. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण विभाग 
------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action force chairman member unable Dr New party formed under the chairmanship of Raghunath Mashelkar