पत्रिपुलाचे काम अंतिम टप्प्यात; रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरच पाहणी 

रविंद्र खरात
Saturday, 17 October 2020

कल्याणमधील पत्रिपूल गर्डर ठेवण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचा गट सुरू असलेल्या पत्रिपुलाच्या कामाची पाहणी करणार आहे.

कल्याण ः कल्याणमधील पत्रिपूल गर्डर ठेवण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचा गट सुरू असलेल्या पत्रिपुलाच्या कामाची पाहणी करणार आहे. त्यानंतर त्यांनी हिरवा कंदील देताच चार तासांचे दोन म्हणजे 8 तासांचे पॉवर ब्लॉक घेऊन रेल्वे लाईनवर पत्रिपुलाचा सांगाडा टाकण्यात येणार आहे. हे काम डिसेंबर अखेरीस पूर्ण करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पत्रिपूल वाहतुकीला खुला होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

'ती'चा प्रवासाचा आनंद औट घटकेचा! गोंधळाचा फटका, आनंदावर विरजन

कल्याण शिळफाटा रोडवरील रेल्वे लाईनवरून जाणारा जुना 104 वर्षे जुना पत्रिपूल धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला. नव्याने पत्रिपुलाचे काम रस्ते विकास महामंडळ करत आहे. नवीन पत्रिपुलाची लांबी 110 मीटर असून पुलाची रुंदी 11 मीटर आहे. पुलाच्या कामात ओपन वेब स्ट्रील गर्डर 77 मीटर असून सेमी थ्रू टाईप स्टील गर्डर 33 मीटर, 1200 मी. मी व्यासाचे 22 नग पाईल फाऊंडेशन 3 नग (2 अब्रुटमेंट व 1 पियर) आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यात गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गट कल्याणमध्ये रस्ते विकास महामंडळामार्फत पत्रिपुलाच्या कामाची पाहणी केली जाणार आहे. त्यांनी हिरवा कंदील देताच पत्रिपुलाच्या अंतिम टप्प्यातील कामाला सुरुवात होईल. 

मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे मान्य करावे; 'मदरसे बंद'च्या भूमिकेवरू कॉंग्रेसची टीका

काम पूर्ण होण्यास दीड महिना - 
रेल्वे लाईनवरील पत्रिपूल सांगडा टाकण्यासाठी रेल्वेकडे 4 तासांचे दोन म्हणजे 8 तासांचा पॉवर ब्लॉक मागितला आहे. रेल्वे कधी पॉवर ब्लॉक देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेल्वेची मंजुरी मिळताच पत्रिपुलाचे काम पूर्णत्वाकडे जाईल यासाठी एक ते दीड महिने लागणार असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पत्रिपूल वाहतुकीला खुला होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patripula work in the final stages Soon inspection by senior railway officials