Mumbai News : बेस्ट बसमध्ये मोबाईलवर बोलताना यापुढे जपून बोला!

मोबालाईवर मोठ्याने ऑडिओ, व्हिडीओ लावणा-या प्रवाशांवर कारवाई होणार
Action taken against passengers who play loud audio and video on Mobile BEST bus
Action taken against passengers who play loud audio and video on Mobile BEST bussakal

मुंबई - बेस्टच्या बसमधून प्रवास करताना मोबाईलवर आता जपून बोलावे लागणार आहे. फोनवर मोठ्याने संभाषण केल्याने अथवा गाणी लावल्याने प्रवाशांना त्याचा त्रास होतो. प्रवाशांच्या बेस्टकडे तशा तक्रारी आल्या आहेत. याची दखल बेस्टने घेतली असून अशा प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. बेस्टने तसे परिपत्रकच जारी केले आहे.

हे परिपत्रक बसेसमध्ये लावले जाणार असल्याची माहिती बेस्टच्या सुत्रांनी दिली. सद्या सर्वांकडेच मोबाईल असतात. बेस्ट बस मधून प्रवास करताना अनेकदा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी किंवा चित्रफीत पाहिल्या जातात. काही प्रवाशी जोरजोरात मोबाईलवर बोलतात. याचा सहप्रवाशांना त्रास होता. अनेकवेळा प्रवाशांमध्ये यावरून खटकेही उडतातय हे प्रकार टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना मोबाईलवर इअर फोन शिवाय ऑडिओ किंवा व्हिडिओ बघण्यास तसेच मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास बंदी घातली आहे.

नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास प्रवाशांवर पोलीस कायद्यानुसार (कलम ३८/११२) नुसार कारवाई करण्यात येईल. याबाबतचे परिपत्रक बेस्टच्या सर्व बसेसमध्ये येत्या काही दिवसांत लावण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com