
मुंबई : विलेपार्ले येथील जैन मंदिरावरील मुंबई महापालिकेने केलेली पाडकामाची कारवाई योग्य असल्याचे बुधवारी (ता. ९) उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मंदिरावरील पाडकाम कारवाईचे आदेश देणाऱ्या शहर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध ट्रस्टने दाखल केलेले अपील फेटाळून लावले. तसेच, महापालिकेने केलेली कारवाई योग्य ठरवली. मंदिराच्या जागी ठेवलेला राडारोडा उचलण्याचे आणि त्यासाठी येणारा खर्च वसूल करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी महापालिकेला दिले.