विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडुका! BMC पोलिस संरक्षणात कारवाई करणार

समीर सुर्वे
Sunday, 22 November 2020

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर हा महिना मुंबईची परीक्षा पाहणारा आहे. त्यामुळे वारंवार सूचना करूनही मास्क वापरण्याचे प्रमाण कमी असलेल्या भागात पोलिस संरक्षणातच महापालिका कारवाई करणार आहे. उद्यापासूनच (ता. 23) ही कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई : कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर हा महिना मुंबईची परीक्षा पाहणारा आहे. त्यामुळे वारंवार सूचना करूनही मास्क वापरण्याचे प्रमाण कमी असलेल्या भागात पोलिस संरक्षणातच महापालिका कारवाई करणार आहे. उद्यापासूनच (ता. 23) ही कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - वृद्धाच्या पायाला चार किलोची गाठ! शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या दुखण्यातून सुटका

कोव्हिडकाळात राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेने कारवाई केली आहे; मात्र अनेक भागांत पालिका कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची बाचाबाचीही झाली. तसेच पालिका पथकावर हल्लाही झाला आहे. कोव्हिड सध्या नियंत्रणात असला तरी दुसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे तसेच वैयक्तिक स्वच्छता राखणे याला महत्त्व आहे. त्यामुळे आता पोलिस संरक्षणातच पालिका कारवाई करणार आहे. उद्यापासूनच ही कारवाई सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - खरेदी कक्षातील अधिकाऱ्यांमुळे कोट्यवधीची बिले थकली! औषध वितरकांचा आरोप

मास्क वापरण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. 70-80 टक्के नागरिक रस्त्यावर मास्क लावून दिसतात; मात्र जे मास्क लावत नाहीत, त्यांना स्वतःला किंवा त्यांच्यापासून इतरांना कोव्हिडचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. 

 

काही भागांत वारंवार सूचना करूनही मास्क वापरण्यास टाळाटाळ केली जाते. अशा भागात पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनमध्ये पालिकेचे पथक असेल. ते मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करतील. 
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त, पालिका 

 

आठ कोटी 33 लाखांचा दंड 
विनामास्क फिरणाऱ्यांकडून आठ कोटी 33 लाख 76 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तीन लाख 97 हजार 824 जणांवर कारवाई झाली आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागात 90 जणांचे पथक तयार केले आहे. 

action on those who walk without masks BMC will take action under police protection

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action on those who walk without masks BMC will take action under police protection