पाणी पुरीसाठी अस्वच्छ पाण्याचा वापर करणाऱ्या वेलकम स्वीटस अँड स्नॅक्सवर कारवाई

शरद वागदरे
Monday, 30 November 2020

ऐरोली सेक्टर 16 मधील वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्स असणाऱ्या पाणीपुरी  आणि ज्यूस कॉर्नरमध्ये शौचालयामधील असणाऱ्या नळांतील पाण्याचा वापर केल्याचा प्रकार काल शनिवारी उघडकीस आला होता. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.  

मुंबईः  ऐरोली सेक्टर 16 मधील वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्स असणाऱ्या पाणीपुरी  आणि ज्यूस कॉर्नरमध्ये शौचालयामधील असणाऱ्या नळांतील पाण्याचा वापर केल्याचा प्रकार काल शनिवारी उघडकीस आला होता. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.  त्यानंतर रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने याठिकाणी धाड टाकली. वेलकम स्वीट्स कॉर्नर सील केले आहे.

ऐरोलीमध्ये वेलकम स्वीटस अ‍ॅण्ड स्नॅक्सच्या तीन शाखा आहे. त्यातील सेक्टर १६ येथील शॉपमध्ये ज्युस सेंटर आणि पाणीपुरीमधील शौचालयामधील पाण्याचा वापर होत असल्याचे निर्दशनास आले होते. शनिवारी झालेल्या घटनेनंतर रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली. पथकाने केलेल्या पाहणीत पाणी पुरीसाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले अधिकाऱ्यांनी स्नॅक्स कॉर्नरमधील फूड साहित्य देखील ताब्यात घेतले. हे खाद्य साहित्य तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाने वेलकम स्वीट कॉर्नर शॉप पुढील अहवाल येईपर्यंत सील केले आहे.

अधिक वाचा-  उर्मिला मातोंडकर मुळच्या शिवसैनिकच, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

वेलकम स्वीट्स अँड स्नॅक्स कॉर्नमध्ये खाद्यपदार्थ बनविताना शौचालयाचे पाणी वापरण्याचे असल्याचे तपासात समोर आले आहे. या शॉपमधील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेणे आले आहेत. तपासण्या होईपर्यंत वेलकम स्वीट कॉर्नर सील करण्यात आले आहेत. संबंधित प्रकाराबाबत दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल.
सुरेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त कोकण विभाग

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Action Welcome Sweets and Snacks for using unsafe water for water purification navi mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action Welcome Sweets and Snacks for using unsafe water for water purification navi mumbai