esakal | उर्मिला मातोंडकर मुळच्या शिवसैनिकच, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

उर्मिला मातोंडकर मुळच्या शिवसैनिकच, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी उर्मिला मातोंडकरने नाव सुचविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

उर्मिला मातोंडकर मुळच्या शिवसैनिकच, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी उर्मिला मातोंडकरने नाव सुचविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  उर्मिला मातोंडकर या मूळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित उद्या त्यांचा पक्षप्रवेश होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईवरुन भाजप सरकारवर सडकून टीका आहे. मुंबई पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारला. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं की, उर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच होत्या. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल.

अधिक वाचा-  जागा ठरली ! तुम्हाला दिली जाणारी कोरोनाची लस मुंबईत 'इथे' साठवली जाणार

उर्मिलाने कॉंग्रेसमधून 2019 मध्ये उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोठ्या फरकाने तिचा परभाव झाला असला तरी तिने दिलेल्या लढतीचे कौतुक होत होते. मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच पाठिंबा मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी पक्षश्रेष्टींकडे केली होती.

अधिक वाचा-  रेल्वे मार्गावर महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, आठवड्याभऱ्यात विनयभंगाच्या दोन घटना

निवडणुकीनंतर ती कॉंग्रेसपासून लांब गेली. त्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावतने शिवसेना आणि बॉलिवूडसोबत पंगा घेतला होता. त्यामुळे कंगानलाा थेट प्रत्त्युतर देणारी उर्मिला मातोंडकर ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून तिचे नाव सुचवले.तसेच यापूर्वी उर्मिला आणि ठाकरे यांच्यात चर्चाही झाली होती. तेव्हापासून ती शिवसेनेत प्रवेश कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Actress Urmila Matondkar original Shiv Sainik mp Sanjay Raut big statement

loading image