Coronavirus : गैरहजर राहणाऱ्यांवर होणार कारवाई, 13 सफाई कर्मचारी रडारवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 मे 2020

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या कोरोना विभागासह रुग्णालयातील सफाई करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर असते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या कोरोना विभागासह रुग्णालयातील सफाई करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर असते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून 13 सफाई कर्मचारी गैरहजर असल्याची बाब उघडकीस आली आहे. या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. 

नक्की वाचा : काय सांगता ! सोन्याच्या बांगड्या नाही तर प्रवासी बॅग घेऊन चोरट्यांचा पोबारा...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड 19 साठी आरक्षित करण्यात आले. या रुग्णालयात केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला जिल्हा सामान्य रुग्णालयात सात कक्षासह एक अतिदक्षता विभाग कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सुरु करण्यात आले आहे. या विभागाची नियमितपणे साफसफाइची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, उपलब्ध सफाई कर्मचाऱ्यांपैकी 13 कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून गैरहजर आहेत. 

मोठी बातमी : मातोश्रीच्या दारावर पुन्हा कोरोनाची ठकठक, आणखी तीन पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

इतर कर्मचाऱ्यांवर ताण
तीन सत्रात अवघ्या 30 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सफाईचे काम करावे लागत आहे. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना मधुमेह, रक्तदाब असे आजार असूनदेखील ते कर्तव्य बजावत आहे. मात्र, गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या १३ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. मात्र, तरीही ते कर्मचारी कामावर हजर होत नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

Action will be taken against absentees District Surgeon Information, 13 staff on radar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken against absentees District Surgeon Information, 13 staff on radar