मुंबईतील 465 कोविड केंद्र बंद, पुढील दोन महिने पालिका ठेवणार आपल्या ताब्यात

मिलिंद तांबे
Wednesday, 16 December 2020

 मुंबईतील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 9,068 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे 465 कोविड केंद्र बंद करण्यात आली आहेत.

मुंबईः  मुंबईतील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 9,068 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे 465 कोविड केंद्र बंद करण्यात आली आहेत. सध्या ही केंद्र बंद करण्यात आली असली तरी साधारणता पुढील दोन महिने पालिका ती आपल्या ताब्यात ठेवणार आहे.

मुंबईत सकारात्मक रूग्णांचा दर 13.58 पर्यंत खाली आला आहे. बरे होण्याच्या दरात वाढ होऊन तो 93 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्याचे दिसते. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा आकडा कमी होत आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने 517 पैकी 465 कोविड काळजी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या 52 केंद्र सुरू असून त्यात रूग्णांवर उपचार होत आहेत.

धारावीसह वरळी, प्रभादेवी, लोअर परळ कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून पुढे आले होते.  तेथील रूग्णांची संख्या देखील घटली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पालिकेने महालक्ष्मी येथील कोविड केंद्र बंद केलं. तेथील 1100 खाटांपैकी केवळ 200 ऑक्सिजन  खाटा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई विभागातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत दररोज सरासरी 500 रूग्ण आढळत असून एकूण रुग्णसंख्या 2 लाख 85 हजार 580 झाली आहे. तर मृतांचा आकडा ही नियंणात असून तो 10 हजार 995 इतका आहे. आतापर्यंत 2 लाख 64 हजार 851 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण दुपटीचा दर 332 दिवसांवर गेला आहे. तर 14 डिसेंबरपर्यंत एकूण 1 लाख 15 हजार 153 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.21 इतका नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा- आज अर्जुन रामपालची एनसीबीकडून पुन्हा होणार चौकशी

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून चाचण्यांची संख्या 18 हजाराच्या आसपास गेली आहे. मुंबईतील रूग्णांची संख्या नियंत्रणात आहे. असे असले तरी खासगी रूग्णालये तसेच कोविड काळजी केंद्रातील खाटा पुढील दोन महिने तरी आपल्या ताब्यात ठेवणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Active patients Mumbai down 465 Covid Care centers closed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Active patients Mumbai down 465 Covid Care centers closed