Sumeet Raghvan : पैसे घेऊन मुजरा करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; सुमीत राघवन

सुमीत राघवनविरोधात पर्यावरणवाद्यांचा संताप
Sumeet Raghvan
Sumeet Raghvan

मुंबई : अभिनेते सुमीत राघवन यांनी फ्रान्समधील घटनेचा व्हिडिओ ट्विट करत ‘आरे बचाव’ कार्यकर्त्यांवर टीका केली आहे. राघवन यांच्या ट्विटवर पर्यावरणवादी संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे. वातानुकूलित घर आणि गाडीच्या बाहेर कधीही न पडलेल्या अभिनेत्याला निसर्गाशी एकरूप होणे कसे सध्या होणार, पैसे घेऊन मुजरा करणाऱ्या अभिनेत्यांनी पर्यावरणासाठी झगडणाऱ्या आंदोलकांना शिकवू नये,’’ अशी टीका वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन डी. यांनी केली.

राघवन यांनी फ्रान्समधील वातावरण बदलाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा व्हिडिओ शेअर केला आहे. पोलिस या आंदोलकांना फरफटत रस्त्यावरून बाहेर फेकत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘आरे कार्यकर्त्यांबरोबर असेच करायला हवे होते आपण. हे फालतू लोक डोक्यावर बसले होते. ते काही कामाचे नाहीत झोलाछाप, अशी टिप्पणी करत सुमीत राघवन यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com