ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

मराठी आणि हिंदीत सुमारे 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या होत्या. आज सकाळी मुंबईतील गावदेवी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे (वय 78) यांचे आज (सोमवार) सकाळी मुंबईतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी आणि हिंदीत सुमारे 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या होत्या. आज सकाळी मुंबईतील गावदेवी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विजू खोटे यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. संवादकौशल्य  आणि उंचपुरी शरीरयष्टी अशी ओळख असलेल्या विजू खोटे यांच्या अंदाज अपना अपना, कालिया, अशी ही बनवा बनवी हे प्रसिद्ध चित्रपट आहेत. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली होती. त्यातील सरदार मैने आपका नमक खाया है हा संवाद अजूनही कोणी विसरलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor Viju Khote passes away in Mumbai