प्रसिद्धीसाठी कंगना रणौतचा वरचा मजला रिकामा - निलम गोऱ्हे |Kangna ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangna ranaut

प्रसिद्धीसाठी कंगना रणौतचा वरचा मजला रिकामा - निलम गोऱ्हे

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: "बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतने (Kangna ranaut) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगना रणौतचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा" अशी मागणी शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांनी केली आहे.

कंगना रणौत काय म्हणाली?

१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, असं विधान कंगनाने केलं. टाइम्स नाऊ'च्या समिट २०२१ मध्ये तिने हे विधान केलं. "सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीख होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं," असं कंगना म्हणाली.

हेही वाचा: माफी मागत ट्विट डिलिट करा; अमृता फडणवीसांची मलिकांना नोटीस

निलम गोऱ्हेंनी काय मागणी केली?

"सन्मानीय राष्ट्रपती महोदयांनी कंगना राणौतला नुकताच पद्म पुरस्कार प्रदान केला. त्याच्या नंतर कंगना राणौतने आज अत्यंत बेजबाबदर, निराधार आणि स्वातंत्र्य योद्धयांचा अपमान करणारे विधान केलं आहे. त्याचा मी निषेध करते" असे निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

"प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असणारी त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौतने 1947च्या स्वातंत्र्य लढ्यात जीवन संमर्पित करणाऱ्या योद्धायांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. त्यामुळे तिचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करत आहे" असे निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top