माफी मागत ट्विट डिलिट करा; अमृता फडणवीसांची मलिकांना कायदेशीर नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amruta Fadnavis

माफी मागत ट्विट डिलिट करा; अमृता फडणवीसांची मलिकांना नोटीस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: राज्यात सध्या नवाब मलिक (Nawab malik) विरुद्ध देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) असा सामना सुरु आहे. पत्रकार परिषद घेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. नवाब मलिकांच्या जावयाकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. दोघांनीही परस्परांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दरम्यान आता नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिकने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा: निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीसांना पाठवली नोटीस

अमृता फडणवीस यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये, येत्या 48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असं बजावण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असं त्यांना बजावण्यात आलं आहे. मानहानीच्या खटल्यासोबतच फौजदारी कारवाईचाही इशारा देखील नोटिशीतून देण्यात आला आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: सतेज पाटलांना रोखण्यासाठी भाजपाची रणनीती; चुरशीच्या निवडणुकीचे संकेत

दुसरीकडे, निलोफर यांचे पती आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हा आरोप केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.

loading image
go to top