esakal | अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची १ कोटी ६० लाखाला फसवणूक, जुहू पोलिसात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

शिल्पा-सुनंदा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची १ कोटी ६० लाखाला फसवणूक, जुहू पोलिसात तक्रार

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: अश्लील व्हिडिओ प्रकरणात राज कुंद्राच्या (raj kundra) अटकेमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) आईची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी (sunanda shetty) यांनी जुहू पोलिसात (juhu police) तक्रार नोंदवली आहे. सुधाकर घारे यांच्या विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली असून ते मूळचे तालुका कर्जत जिल्हा रायगडचे शेतकरी आहेत. सुनंदा यांनी मे 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान सुधाकर यांच्याकडून कर्जत येथील एका जमिनीचा व्यवहार केला होता. (Actress shilpa shetty moter sunanda shetty file police complaint in juhu police station in cheating case dmp82)

यावेळी जमीन ही स्वत:च्या नावावर असल्याचे सांगून सुधाकरने जमीन व बंगल्याची खोटी कागदपत्रे बनवून सुनंदा यांना हे सर्व 1 कोटी 60 लाखांना विकले. कालांतराने ही बाब सुनंदा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुधाकरकडे पैशांसाठी तगादा लावला.

हेही वाचा: आज मुंबईतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय होणार?

सुधाकर हा एका राजकिय नेत्याचा जवळचा हस्तक असल्याचे सांगितले जाते. मात्र पैसे परत करणार नाही, कोर्टात जा अशी धमकी सुधाकर देत असल्याचे सुनंदा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सुनंदा यांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहे.

loading image
go to top