
अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर उद्या (ता.30) शिवसेनेत प्रवेश करणार आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी ऊर्मिला मातोंडकरचे नाव सुचविण्यात आले आहे.
मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर उद्या (ता.30) शिवसेनेत प्रवेश करणार आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी ऊर्मिला मातोंडकरचे नाव सुचविण्यात आले आहे.
ऊर्मिलाने कॉंग्रेसमधून 2019 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोठ्या फरकाने तिचा परभाव झाला असला तरी तिने दिलेल्या लढतीचे कौतूक होत होते; मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच पाठिंबा मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. निवडणुकीनंतर ती कॉंग्रेसपासून लांब गेली. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना आणि बॉलीवूडसोबत पंगा घेतला होता. त्यामुळे तिला थेट प्रत्युत्तर देणारी ऊर्मिला मातोंडकर ही एकमेव बॉलीवूड अभिनेत्री होती. यामुळे शिवसेनेने तिला पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून तिचे नाव सुचवले. तसेच यापूर्वी ऊर्मिला आणि ठाकरे यांच्यात चर्चाही झाली होती. तेव्हापासून ती शिवसेनेत प्रवेश कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस उद्या ऊर्मिला शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)