वेगवान सेवेसाठी 'अदानी'चा डिजिटलवर भर; ग्राहकांना गुगल असिस्टंट, स्मार्ट वीजमीटर मिळणार

कृष्ण जोशी
Sunday, 29 November 2020

मुंबईला अखंडित वीजपुरवठा करतानाच ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी अदानी इलेक्‍ट्रिसिटीने डिजिटल माध्यमांवर भर दिला आहे. लवकरच अदानीतर्फे व्हिडिओ कॉंटॅक्‍ट सेंटर, ऍलेक्‍सा व गुगल असिस्टंटचा व्हॉईस बोट प्लॅटफॉर्म, स्मार्ट वीजमीटर आदी वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रथमच आणल्या जाणार आहे.

मुंबई, : मुंबईला अखंडित वीजपुरवठा करतानाच ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी अदानी इलेक्‍ट्रिसिटीने डिजिटल माध्यमांवर भर दिला आहे. लवकरच अदानीतर्फे व्हिडिओ कॉंटॅक्‍ट सेंटर, ऍलेक्‍सा व गुगल असिस्टंटचा व्हॉईस बोट प्लॅटफॉर्म, स्मार्ट वीजमीटर आदी वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रथमच आणल्या जाणार आहे.
 
सध्या अदानीने दिलेल्या सुविधांचा लाभ घेत ग्राहक स्वतःच मीटर रीडिंग घेऊन पाठवणे, ई-मेल व एसएमएसद्वारे बिले घेणे, अदानीचे संकेतस्थळ किंवा ऍपवर बिल पाहणे, ऑनलाईन पद्धतीने बिले भरणे, नव्या जोडणीसाठी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आदी बाबी करू लागले आहेत. अशा इलेक्‍ट्रॉनिक वापरास प्रोत्साहन देण्याचे अदानीचे धोरण आहे. अदानीच्या पाच विभागांमध्ये 90 स्वयंसहायत्ता किऑस्क मशीन असून ग्राहक तेथे स्वतःचे व्यवहार स्वतःच करू शकतात. तेथे बिले भरणे, तक्रार नोंदवणे, बिलाची प्रत घेणे, व्हिडिओ कॉल सेंटरवर तक्रार नोंदवणे आदी कामे करता येतात. त्यांच्या कस्टमर मोबाईल ऍपमार्फतही अशी सर्व कामे करता येत असून त्यातून बिलांचा आणि वीजवापराचा तपशीलही पाहता येतो. अदानी इलेक्‍ट्रिसिटीतर्फे दोन हजार मेगावॉट वीज पुरवली जाते. 

ग्राहकसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आता इलेक्‍ट्रॉनिक सेवांवर भर देण्यात येत आहे. त्याचा फायदा मुंबईतील तीस लाख ग्राहकांना होईल व त्यांना 99.99 टक्के अचूक सेवा मिळेल. स्मार्ट मीटर, चॅटबोट एलेक्‍ट्रा, अत्याधुनिक पेमेंट किऑस्क आदी माध्यमातून भविष्यात संपर्करहित (कॉंटॅक्‍टलेस) वापर करण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे, असे अदानी इलेक्‍ट्रिसिटीच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 

अशा आहेत नवीन सेवा 

  • पहिलेवहिले व्हिडिओ कॉंटॅक्‍ट सेंटर. ग्राहकांना सर्व सेवा घरात बसून व्हर्च्युअल पद्धतीने एजंटशी संपर्क साधून उपलब्ध करून घेता येतील. ग्राहक त्यांच्या सोयीने व्हिडिओ कॉंटॅक्‍ट सेंटरच्या अधिकाऱ्याची वेळ घेऊ शकतील. अदानीच्या मोबाईल ऍप, संकेतस्थळ तसेच चॅटबोट एलेक्‍ट्राच्या माध्यमातून ग्राहक कॉल करू शकतील. 
  • अदानीच्या ऍलेक्‍सा व गुगल असिस्टंटच्या व्हॉईस बोट प्लॅटफॉर्मवर अनेक भाषांमधून व्यवहार होतील. अदानीच्या सर्व सेवा एका ध्वनी आदेशावर (व्हॉईस कमांड) उपलब्ध होतील. अशी सेवा मुंबईतील ग्राहकांसाठी लवकरच सुरू केली जाईल. 
  • मुंबईतील ग्राहकांना लवकरच सात लाख स्मार्ट मीटर मिळणार असून त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीजवापरावर लक्ष ठेवता येईल. 
     

----------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adani's emphasis on digital for faster service; Customers will get Google Assistant, a smart electricity meter