esakal | Mumbai : पार्टी संस्कृतीमुळे व्यसनाधीनतेत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai : पार्टी संस्कृतीमुळे व्यसनाधीनतेत वाढ

Mumbai : पार्टी संस्कृतीमुळे व्यसनाधीनतेत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अनेक किशोरवयीन मुले ‘रेव्ह पार्टी’मध्ये मादक पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक तसेच सामाजिक कारणांसह पार्टी संस्कृतीचा भडिमार व कोवळ्या वयात न आलेली समज लहान मुलांना व्यसनाधीनतेकडे खेचत असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले.

फक्त श्रीमंतच नाही, तर सर्वच स्तरांतील कोवळी मुले व्यसनांकडे वळत असल्याचे डॉ. मुंदडा म्हणाले. मित्रमंडळींचा दबाव व्यसनाधीनतेला कारणीभूत आहे. त्याशिवाय समाज माध्यमांमुळे मादक पदार्थ अगदी सहज आणि स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे लहान मुले नशेच्या आहारी जात असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.किशोरवयात आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याची धडपड असते. त्यातून मुले व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विभावरी पाटील यांनी सांगितले. या वयात मुलांमध्ये काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्ददेखील असते. मुलांमधील संप्रेरके बदलत असल्यानेही मुले मादक पदार्थांच्या आहारी जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.

२५ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना आपल्या भावना नियंत्रित ठेवता येत नाहीत. त्यामुळे या वयात मुलांचे पाऊल मादक पदार्थांच्या सेवनाकडे वळत आहे.

- डॉ. वृषाली राऊत, मानसशास्त्रज्ञ.

काय करावे?

  • मुलांना समजून घ्यायला हवे

  • मुलांना अमली पदार्थांची शास्त्रोक्त माहिती द्यावी

  • व्यसनांमुळे काय परिणाम होतात, याची माहिती द्यावी

  • मुलांच्या व्यसनाबद्दल कळाल्यास त्यांना विश्वासात घेऊन समजूत काढावी. त्यांना चिडू किंवा मारू नये.

  • मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते विळख्यातून बाहेर पडू शकतात

loading image
go to top