दिवाळी आणि छट पूजेनिमित्त एलटीटी-हटिया दरम्यान अतिरिक्त उत्सव गाड्या

प्रशांत कांबळे
Tuesday, 10 November 2020

दिवाळी आणि छट पूजेनिमित्त प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हटिया दरम्यान सहा अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : दिवाळी आणि छट पूजेनिमित्त प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हटिया दरम्यान सहा अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

या रेल्वेमध्ये दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, चार द्वितीय श्रेणीचे डबे असतील. संपूर्णतः आरक्षित उत्सव विशेष गाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह 10 नोव्हेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. दरम्यान, आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी राहणार आहे. 

मुंबईतील 2 हजार 230 इमारती कोविडमुक्त; प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संख्येत वाढ

ही विशेष गाडी 14 ते 28 नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी हटिया येथून सकाळी 9.40 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता पोहोचेल; तर 16 ते 30 नोव्हेंबरपर्यंत दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 12.15 वाजता सुटेल आणि हटियाला दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता पोहोचेल. 
-

Additional festive trains between LTT-Hatia for Diwali and Chhat Puja

----------------------------------------------------

  ( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional festive trains between LTT-Hatia for Diwali and Chhat Puja