Mumbai Crime News: धक्कादायक! ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Mumbai Crime News: धक्कादायक! ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार अन्...

गेल्या काही दिवसांमध्ये महिलांच्या अत्याचारांमद्धे सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत अंधेरी पूर्व परिसरात एका ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी गुंदवली येथे राहणाऱ्या एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमाने अत्याचार केला. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुलीच्या पालकांनी या प्रकरणी काल संध्याकाळी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अंधेरी पोलिसांनी त्या नराधम तरुणाला अटक केली आहे.(Latest Marathi News)

मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील गुंदवलीत राहणाऱ्या सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार केला. त्यानंतर या आरोपीने पळ काढला. पीडित मुलीने संपूर्ण प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी काल संध्याकाळी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अंधेरी पोलिसांनी आरोपीचा तपास करत त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.(Latest Marathi News)

टॅग्स :Mumbai NewsCrime News