आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघाची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल

पूजा विचारे
Tuesday, 21 July 2020

मुंबईतील वरळी आणि धारावी हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. यापूर्वी धारावीत कोरोना नियंत्रणात आला. त्यानंतर वरळी कोळीवाड्यानं आता कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. 

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं. राज्यासह मुंबईत सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव पाहायला मिळाला. मुंबई शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा दररोजचा आकडा नवा उच्चांक गाठताना दिसायचा. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं विविध पातळीवर प्रयत्न केले. दरम्यान आता मुंबई महापालिकेनं घेतलेल्या अथक प्रयत्नातून कोरोना नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. मार्चपासून मुंबईत शिरकाव केलेला कोरोना संसर्ग आता नियंत्रणात येतोय. कोरोनाचा प्रार्दुभाव मुंबईत झाला होता. मुंबईतील वरळी आणि धारावी हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. यापूर्वी धारावीत कोरोना नियंत्रणात आला. त्यानंतर वरळी कोळीवाड्यानं आता कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. 

एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा ओळखला जायचा. वरळी कोळीवाडा भागातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊन 13 वर आल्याने प्रशासनासह रहिवाशांनाही दिलासा मिळाला आहे. वरळी कोळीवाडा हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे. येथील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं अथक प्रयत्न केले. 

अधिक वाचाः  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार?, संजय राऊतांनी केलं स्पष्ट

प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून 90 टक्के परिसर वगळण्यात आला आहे. आता केवळ 17 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात असून लवकरच ही ठिकाणेही प्रतिबंधमुक्त होतील, असा आशावाद जी-दक्षिण विभागातील सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी व्यक्त केला.

वरळी कोळीवाड्यात मार्चच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर सतर्क झालेल्या महापालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोळीवाड्यात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. लॉकडाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली. कोरोनाबाधितांना रुग्णालयात, तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आलं.

हेही वाचाः  लॉकडाऊनमध्ये पश्चिम रेल्वेला नफा तर झाला पण भरावा लागला 'इतक्या' कोटींचा भुर्दंड

वरळी कोळीवाड्याप्रमाणेच जिजामाता नगरमध्येही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोळीवाडा, जनता कॉलनी, आदर्श नगरमध्ये 372 रुग्ण होते. त्यापैकी 299 बरे झाले असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही भागांचा विचार केला असता येथे 22 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 13 रुग्ण वरळी कोळीवाड्यातील आहेत. 

वरळी, परळ, प्रभादेवी आणि आसपासच्या परिसराचा समावेश असलेल्या जी-दक्षिण विभागात रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यावर आला आहे. या भागात एकूण ४ हजार 325 पैकी 3 हजार 221 रुग्ण बरे झाले असून 320 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आजघडीला 784 सक्रिय रुग्ण आहेत.

धारावीत कोरोना नियंत्रणात 

धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. आतापर्यंत येथे 82 मृत्यू झाले असून येथील रुग्णसंख्या 3335 पर्यंत गेली होती. दररोज शंभरावर रुग्ण या ठिकाणी आढळत होते. त्यामुळे येथे कोरोनाची भीती निर्माण झाली होती.  लॉकडाऊनमुळे या भागातील छोटे मोठे उद्योग धंदे ठप्प झाले होते. आता इथले उद्योग धंदे पुन्हा सुरू झालेत. काही दिवसांपूर्वी अवघा एक रुग्ण सापडल्यानं सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. आता धारावीने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे. धारावीत कोरोना नियंत्रणात आलाय.

Aditya Thackeray constituency worli koliwada Corona cases in control


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray constituency worli koliwada Corona cases in control