आदित्य ठाकरे पदवीधर अन् संपत्ती कोट्यवधींची...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

उमेदवारी अर्जामधील प्रतिज्ञापत्रानुसार आदित्य ठाकरे हे कोट्याधीश असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरुवार) वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे शिक्षण बीए व कायद्याचे पदवीधर असून, धंदा व्यवसाय आहे. उमेदवारी अर्जामधील प्रतिज्ञापत्रानुसार ठाकरे हे कोट्याधीश असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार कोणत्या उमेदवाराची संपत्ती किती आहे. याच माध्यमातून कोण नेता किती श्रीमंत आहे, याचा अंदाज येतो. आदित्य ठाकरे यांनीही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे. ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य युवानेते आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती
आदित्य ठाकरे कोट्यधीश असल्याचं समोर आले आहे. आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे. यामध्ये 10 कोटी 36 लाखांच्या बँक ठेवी आहेत. 20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडे सहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक आहे. 64 लाख 65 हजारांच्या दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे. तर 10 लाख 22 हजार अशी एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.

वैयक्तीक माहितीः

  • वय - 29
  • शिक्षण - बीए, कायद्याचा पदवीधर
  • धंदा - व्यवसाय

आदित्य ठाकरेंची संपत्ती 11 कोटी 38 लाखांवर

  • बँक ठेवी - 10 कोटी 36 लाख
  • बॉन्ड शेअर्स- 20 लाख 39 हजार
  • वाहन - BMW मोटार, Mh -09 Cb -1234, किंमत - 6 लाख 50 हजार
  • दागिने- 64 लाख 65 हजार
  • इतर - 10 लाख 22 हजार
  • एकूण - 11 कोटी 38 लाख

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray declered assets worth 11 crore 38 lakhs