कौतुकास्पद! एका ट्विटवर रुग्णाच्या मदतीला धावून आले आदित्य ठाकरे..

aditya thackeray
aditya thackeray

मुंबई: कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना आपल्या कुटुंबासोबत मुंबई  सोडून जावं लागलं.  रोजगार नसल्यामुळे या मजुरांना राहतं घरही सोडावं लागलं. पण मुंबईसारख्या शहरात ज्यांना राहायला घरच नाही अशा रस्त्यावर, फूटपाथवर राहणाऱ्या लोकांच्या समस्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अशाच एका रस्त्यावर राहणाऱ्या थंडी-तापानं फणफणणाऱ्या रुग्णाला मदत केली आहे. 

अंधेरीतल्या आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ दीड महिन्यापासून पायाला गँगरीन आणि थंडी-ताप अशा अवस्थेत एक रुग्ण पडून होता. या रुग्णांची माहिती एका नागरिकानं ट्विट करुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिली होती. यानंतर आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेत तत्परता दाखवत अवघ्या २० मिनिटात त्या रुग्णासाठी रुग्णवाहिकेची सोय केली. त्यामुळे या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.  

जयदेव पांचाळ असं या व्यक्तीचं नाव आहे. एका नागरिकानं ट्विट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तत्काळ या ट्विटची दखल आपले  सहकारी राहुल कनाल यांना मदत करण्यास सांगितले. अवघ्या २० मिनिटात राहुल कनाल आणि युवासेनेच्या टीमनं रुग्णवाहिका आणून या रुग्णाला मदत केली.

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णाला तात्काळ उपचार करण्यासाठी अंधेरीच्या कूपर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी रुग्णावर तातडीनं उपचार सुरु केले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार ब्लड रिपोर्ट, सोनोग्राफी, युरिन आणि शुगर टेस्ट करण्यात आली. यानंतर लगेचच रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे या रुग्णांचा जीव वाचला. 

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका ७ दिवसांच्या बाळाचे प्राण वैद्यकीय मदत करून वाचवले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंवर आता कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

aditya thackeray helped poor patient on street 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com