Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

Aditya Thackeray On Mumbai Air Quality: हवेच्या गुणवत्ता खालावल्याने मुंबईतील सर्व खासगी बांधकामांना एक आठवड्यासाठी तातडीने स्थगिती देण्याचं आदित्य ठाकरेंनी पालिका आयुक्तांना पत्र दिलं आहे.
Aditya Thackeray On Mumbai Air Quality

Aditya Thackeray On Mumbai Air Quality

ESakal

Updated on

मुंबई : शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर भीषण पातळीवर पोहोचला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरातील सर्व खासगी बांधकामांना किमान एक आठवड्यासाठी तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रदूषणामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा स्थितीत कोणतीही गुंतवणूक किंवा पर्यटक मुंबईकडे आकर्षित होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com