

मुंबई : प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. या याद्या तयार करण्याची ज्यांची जवाबदारी आहे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. या याद्यांमध्ये सुधारणा कराव्यात आणि याद्यांवर हरकत नोंदविण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली जावी, या प्रमुख मागण्या ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्या.