गोराई गावला आदित्य ठाकरे भेट देणार; वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्यांचा घेणार आढावा

कृष्ण जोशी
Saturday, 9 January 2021

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या गोराई गावच्या समस्या सुटाव्यात यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तेथे लौकरच भेट देणार आहेत. हे प्रश्न धसास लावण्यासाठी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. 

मुंबई  ः वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या गोराई गावच्या समस्या सुटाव्यात यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तेथे लौकरच भेट देणार आहेत. हे प्रश्न धसास लावण्यासाठी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. 

 

मुंबईच्या पार उत्तर टोकाला असलेल्या निसर्गरम्य पर्यटनस्थळ गोराईमधील मूळ रहिवाशांच्या अनेक समस्या आहेत. तेथे रुग्णालय, प्रसूतीगृह, शाळा, कॉलेज नाही, पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. तेथील महापालिकेचा दवाखाना फक्त ऑफिस टाईमलाच खुला असतो. बोरीवलीला जोडणाऱ्या खाडीवर पूल नसल्याने बोटसेवा बंद असली की मोठा वळसा घेऊन भाईंदरवरून मुंबईत जावे लागते. या समस्यांसाठी श्रीमती म्हात्रे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

या विषयावर ज्येष्ठ शिवसेना नेत्यांनी नुकतीच बैठक घेतली होती. त्यानंतर या विभागातील नगरसेवक तसेच प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक ठाकरे यांनी घेतली. गावठाणांना पालिकेने विकासनिधी देणे पुन्हा सुरु करावे, त्यांना विशेष दर्जा देऊन त्यांच्या सोयींसाठी डीपी मध्ये जमिनीची तरतूद करावी, कांदरपाडा येथे कोळी आगरी भवन उभारावे अशा मागण्याही श्रीमती म्हात्रे यांनी यावेळी केल्या. यासंदर्भात गोराईला भेट देऊन पहाणी केली जाईल, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

Aditya Thackeray to visit Gorai village Review issues that have been pending for years

------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray to visit Gorai village Review issues that have been pending for years