Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे उद्या भरणार उमेदवारी अर्ज; शक्तिप्रदर्शन करणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्या (गुरुवार) वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्या (गुरुवार) वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीचे एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना केलं जाणार आहे. 

Vidhan Sabha 2019 : भाजपची दुसरी यादी जाहीर; तावडे, खडसे यांचे नाव नाहीच

आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग :

१) लोअर परळ येथील 'शिवालय' शिवसेना शाखा येथून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरायला निघणार. 
२) गणपतराव कदम मार्ग
३) श्री राम मिल 
४) बीडीडी चाळ 
५) शिवराम अमृतवार मार्ग
६) बनसोडे मार्ग
७) भागोजी वाघमारे मार्ग
८) देवरूखकर मार्ग
९) बीडीडी चाळ क्रं. ६१ आणि ४० 
१०) भोसले मार्ग
११) वरळी नाका
१२) डाँ. ई मोझेस मार्ग
१३ बीएमसी इंजिनियरींग हब
१४ )  बीएमसी इंजिनियरिंग हबच्या तळ मजल्यावरील निवडणुक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार.

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray will File Nomination Form tomorrow 3rd October Maharashtra Vidhan Sabha 2019