
Adivasi community Morcha
ESakal
पालघर : धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीविरोधात शुक्रवारी पालघरमध्ये हजारो आदिवासींनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘नको धनगर, नको बंजारा’ अशा घोषणा देत आदिवासी समाजाने आपला तीव्र विरोध दर्शविला.