

Administration ignored guidelines of cutting trees
ESakal
ठाणे : आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीत प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ फासल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिओ-टॅगिंगशिवाय सुमारे ३०० झाडांची निर्घृण कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सेवा रस्त्यावर वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला.