esakal | जाहिरात फलकाच्या आड येणाऱ्या झाडाची कत्तल
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Cutting

जाहिरात फलकाच्या आड येणाऱ्या झाडाची कत्तल

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

नवीन पनवेल : जाहिरात फलक (Advertisement board) व्यवस्थीत दिसावेत यासाठी रस्त्यांलगतच्या झाडांची सर्रासपणे (Tree cutting) कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाला हानी (environment) पोचून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. याकडे पनवेल महापालिकेच्या (panvel municipal) पर्यावरण, उद्यान, परवाना विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकांवर कोविडचे सावट; मनुष्यबळ नियोजनाचे आव्हान

पनवेल महापालिका क्षेत्रातील अधिकृत ५६ जहिरात फलका पैकी जास्तीत जास्त फलक हे सायन पनवेल महामार्गावरील रस्त्यांच्या कडेला आहेत. हे जाहिरात फलक व होर्डिंग दिसण्यासाठी त्यांची सर्रासपणे कत्तल सुरू आहे. काहींच्या फांद्या छाटल्या आहेत. याबाबत पनवेल महापालिका व सरकारकडे वारंवर तक्रार करूनही हे प्रकार थांबले नाहीत.उलट प्रशासनाकडून या कडे दुर्लक्ष होत आहे. सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल ते कोपरा या ठिकाणी रस्त्या लगत झाडे तोडली आढळली आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील जाहिरात फलकापैकी सर्वात जास्त व मोठे फलक हे सायन पनवेल महामार्गावर आहेत.

सायन-पनवेल मार्ग हा कायमस्वरूपी रहदारी गजबजलेला मार्ग असल्यामुळे या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक आहेत. तसेच या मार्गाच्या कडेला वड,पिंपळ यासारखे मोठे वाढणारे वृक्ष लावण्यात आले आहेत. परंतु या वृक्षांची वाढ झाल्यानंतर ते जाहिरात फलक आड येत असल्या कारणाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी झाडे अर्ध्यातून छाटले जातात व त्यांची वाढ खुंटली जात आहे. रस्ता रुंदीकरणानंतर या मार्गालगत मोठ्या प्रमाणावर वटवृक्ष व पिंपळाच्या झाडांची लागण करण्यात आली आहे.

परंतु या रस्त्यालगत असलेल्या जाहिरात फलकामुळे या झाडांचे भवितव्य अंधारात आहे. जाहिरात फलक दिसण्यासाठी हि झाडे वाढूच दिली जाणार नाहीत. कळंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांनी याविषयी वारंवार आवाज उठवला होता. परंतु झाडे तोडणार्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्या पलीकडे कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वृक्षांचे भवितव्य अंधारात आहे.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

"सायन-पनवेल महामार्ग वरील रस्त्याच्या कडेला असलेली झाडे अज्ञातांनी अर्धवट तोडल्याचे निदर्शनास आले आहे. या पुर्वी ही अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित ठिकाणी पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत."

- विठ्ठल डाके, उप आयुक्त पनवेल महानगरपालिका

"वृक्षांच्या परिसरात होर्डिंगला परवानगी नसावी. त्यासाठी झाडे तोडू नयेत. त्याला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र अधिकारी असावा. दोषींवर दंडात्मक कारवाई करावी."

- भूषण म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते खारघर

loading image
go to top