कंगनाच्या अडचणी वाढणार? कंगनावर कारवाईसाठी वकिलांचे महाधिवक्त्यांना पत्र

सुनीता महामुणकर
Tuesday, 27 October 2020

अभिनेत्री कंगना रनौतच्या न्यायालयीन अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या न्यायालयीन अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून राज्याच्या महाधिवक्तांनी तिच्यावर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करावी, अशी मागणी एका वकिलाने पत्राद्वारे केली आहे.

कंगनाच्या विरोधात मुंबई आणि बंगळुरूमध्ये फौजदारी फिर्यादी यापूर्वी दाखल झाल्या आहेत. तिने केलेल्या अन्य एका ट्विटसाठीही अंधेरी न्यायालयात तक्रार आहे. तर वांद्रे न्यायालयात तिच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप करणारी तक्रार केली आहे. सोशल मिडियावर वारंवार मुंबई, महाराष्ट्र, मुंबई पोलिस आणि सरकारविरोधात ट्विट केल्याप्रकरणी ऍडव्होकेट अली काशिफ खान देशमुख यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने कंगनावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश वांद्रे पोलिसांना दिले होते. या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तिला चौकशीसाठी समन्स बजावले. मात्र त्यावर तिने पुन्हा ट्विट करून पप्पू सेना असे शब्द वापरत या समन्सची टर उडवली. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे, कारण पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून एफआयआरची कारवाई केली होती, असे या बारा पानी पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाची बातमी : युट्यूबवर व्हिडीओ पाहून थेट एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देशात धार्मिक तेढ निर्माण व्हावी, देशाच्या एकात्मतेला छेद जावा, या हेतुपुरस्सर सातत्याने ही द्वेषपूर्ण ट्विट केली आहेत. त्यामुळे महाधिवकतांनी त्याची दखल घेऊन न्यायालय अवमान कायदा कलम 15 नुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी खान यांनी केली आहे. यापूर्वी याच मुद्यावर अंधेरी न्यायालयात अन्य एकाने दावा दाखल केला आहे.

न्यायालयाच्या अवमानासंबंधित कारवाई करताना महाधिवक्तांची शिफारस महत्वपूर्ण असते. अशी शिफारस मिळाली कि त्यानुसार संबंधित व्यक्तींंवर कारवाईची प्रक्रिया सुरु होऊ शकते.

( संपादन - सुमित बागुल )

advocate writes letter to advocate general to take action on kangana for condemn of court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advocate writes letter to advocate general to take action on kangana for condemn of court