युट्यूबवर व्हिडीओ पाहून थेट एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अनिश पाटील
Tuesday, 27 October 2020

मुलुंड पश्चिमेमधल्या इंडियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून चोरी करू पाहणाऱ्या चार आरोपींना मुलुंड पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : मुलुंड पश्चिमेमधल्या इंडियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून चोरी करू पाहणाऱ्या चार आरोपींना मुलुंड पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. त्यामधील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

'गो कोरोना गो' म्हणणाऱ्या रामदास आठवलेंना कोरोनाची लागण

युट्युबवर एटीएम फोडण्याचे व्हिडिओ सर्च करून ते पाहून त्यानुसार कट रचून या आरोपीनी मुलुंड मधल्या इंडियन बँकेच्या एटीएम मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोरी करत असताना पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या पळून गेलेल्या चारही आरोपींना अवघ्या 12 तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. 22 ऑक्‍टोबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास या आरोपीनी मुलुंड मधल्या एका एटीएम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सर्व आरोपींनी काळ्या रंगाचे शर्ट घातलेले होते शिवाय मास्क घालून स्वतःचा चेहरा सुद्धा लपवण्याचा प्रयत्न केला होता असे पोलीस तपासात समोर आलेला आहे.

मुंबईत हाय अलर्ट, ड्रोन उडवण्यास पोलिसांची बंदी 

आरोपीनी चोरी करताना आपली ओळख उघड होऊ नये म्हणून एटीएम सेंटरमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरावरती काळ्या रंगाचा स्प्रे फवारला होता असं सीसीटीवी मधून उघड झालेल आहे. मात्र युट्युबवर एटीएम फोडण्याचे व्हिडिओ पाहून रचलेला कट पूर्णपणे फसला असून या आरोपीना आता अटक करण्यात आली आहे.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trying to blow up an ATM directly by watching a video on YouTube Handcuffs by police