आफ्रिकन नागरिक नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोसाठी डोकेदुखी?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आले आहे. एनसिबीने लिहिलेल्या पत्रात काही आफ्रिकन देशातील नागरिकांना प्रवासबंदीची मागणी करण्यात आली आहे.
Narcotics Control Bureau
Narcotics Control Bureausakal
Summary

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आले आहे. एनसिबीने लिहिलेल्या पत्रात काही आफ्रिकन देशातील नागरिकांना प्रवासबंदीची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आले आहे. एनसिबीने लिहिलेल्या पत्रात काही आफ्रिकन देशातील नागरिकांना प्रवासबंदीची मागणी करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने परराष्ट्र मंत्रालय आणि इंटेलिजेंस ब्युरोला लिहिलेल्या पत्रात, भारतभर विशेषत: मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरामध्ये ड्रग्जच्या तस्करीच्या कारवायांमध्ये गुंतलेल्या आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करताना येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली आहे. तसेच तपास यंत्रणांना चकमा देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध युक्त्याचा उल्लेख पत्रात केला आहे. परिणामी काही आफ्रिकन देशांसाठी बंदी किंवा कठोर व्हिसा धोरण राबवण्यात यावे, अशी पत्रात मागणी करण्यात आली आहे.

अमली पदार्थांचे सिंडिकेट

विविध अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांपैकी 90 टक्के हे नायजेरियातील आहेत. संपूर्ण भारतात, विशेषत: मुंबई आणि दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नायजेरियन नागरिकांची उपस्थिती, अंमली पदार्थ विरोधी एजन्सीसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. कारण अटक करूनही तपास यंत्रणांना चकमा देण्यासाठी विविध डावपेच वापरतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, अमली पदार्थांच्या सिंडीकेटचे मूळ आफ्रिकन देशांमध्ये असून भारतात राहणारे विविध आफ्रिकन नागरिक देखील या सिंडिकेटचा भाग आहेत.'

गुन्हेगारीत वाढ

एनडीपीएस प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 परदेशी नागरिकांच्या अटकेमध्ये आठ ते नऊ आफ्रिकन देशांतील नागरिक आकडेवारीत सापडले आहेत. सामान्यतः नायजेरियन नागरिकांची संख्या जास्त आहे. यावर्षी मुंबईत नायजेरिया, युगांडा, टांझानिया आणि आयव्हरी कोस्टमधील 20 आफ्रिकन नागरिकांना मुंबई अँटी नार्कोटिक्स सेल आणि एनसीबीने अटक केली आहे. 2021 मध्ये अमली पदार्थ विरोध पथक आणि एनसीबीने मुंबईत सुमारे 43 आफ्रिकन नागरिकांना अटक केली होती. त्यापैकी 40 नायजेरियातील होते. त्याचप्रमाणे, 2019-20 मध्ये, मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एकट्या मुंबई शहरात सुमारे 25 नायजेरियन लोकांना अटक केली होती.

पासपोर्टचा गैरवापर

एनसीबीच्या माहितीनुसार, पासपोर्टचा दस्तऐवजातील छायाचित्र बदलून एकाच पासपोर्टचा वापर करून अनेक नायजेरियन नागरिकांनी भारतात प्रवेश केला आहे. एकाहून अधिक लोकांना एक पासपोर्ट वापरण्यासाठी या नागरिकांनी त्यांच्या स्वत:च्या देशातील पासपोर्ट प्रणालीची फसवणूक केल्याचे विविध प्रकरणांमध्ये हे लक्षात आले आहे.. इमिग्रेशन ब्युरोने प्रदान केलेल्या डेटानुसार सुमारे 8,000 नायजेरियन नागरिक त्यांच्या व्हिसाची मुदत संपली असूनही भारतात राहत आहेत. 'हे नागरिक मुख्यतः ड्रग्सची तस्करी आणि सायबर फसवणूकीसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा संशय आहे.'

आफ्रिकन डोकेदुखी

2017 मध्ये, आफ्रिकन आणि नायजेरियन नागरिकांचा समावेश असलेल्या ड्रग्सच्या धोक्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला गेला. त्यानंतर गृह मंत्रालयातील तत्कालीन राज्यमंत्र्यांनी आफ्रिकन आणि नायजेरियन नागरिकांना विविध राज्यांनी अटक केलेल्या प्रकरणांचा एकत्रित डेटा प्रसिद्ध केला. या यादीत महाराष्ट्र, दिल्ली आणि गोवा पहिल्या क्रमांकावर होते. आकडेवारीनुसार, 2014 ते 2017 पर्यंत, 331 प्रकरणांमध्ये, सुमारे 364 आफ्रिकन-नायजेरियन नागरिकांसह-भारतभर अटक करण्यात आली, त्यापैकी 166 प्रकरणे महाराष्ट्रात नोंदवली गेली. आणि महाराष्ट्रातून सुमारे 125 आफ्रिकनांना अटक करण्यात आली.एनसीबीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत आफ्रिकन देशांतून भारतात हेरॉइनची तस्करी वाढली आहे. हे मानवी तस्कर किंवा वैयक्तिक सामान तसेच कुरिअर पार्सलद्वारे तस्करी केले जात आहे. दक्षिण आफ्रिका, युगांडा आणि केनिया हे अशा तस्करीचे प्रमुख देश आहेत. 2020-2021 दरम्यान, मानवी तस्करांचा समावेश असलेल्या 52 घटना आणि आफ्रिकन देशांमधून मिळणाऱ्या पार्सलद्वारे तस्करी करणाऱ्या 11 घटनांची एनसीबीकडे नोंद करण्यात आली.

मुंबईला लगतचा बाहेरील परिसरात आफ्रिकन नागरिक बहुतांशी उपस्थित आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतेकांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. ते एकतर अमली पदार्थ तस्करी करणे सिंडिकेट चालवणे अशा प्रकरणांमध्ये किंवा सायबर फसवणुकीत गुंतलेले आहेत.'

- दत्ता नलवडे, पोलीस उपायुक्त, अमली पदार्थ विरोधी पथक, मुंबई पोलीस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com