Mumbai News : उल्हासनगरात अखेर महानगरपालिका परिवहन सेवेच्या 5 बसेस धावू लागल्या; 10 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली

केष्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी 2009 ते 2014 या कालावधीत करार तत्वावर पालिकेची परिवहन सेवा हाताळली होती.
केष्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी 2009 ते 2014 या कालावधीत करार तत्वावर पालिकेची परिवहन सेवा हाताळली होती.
केष्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी 2009 ते 2014 या कालावधीत करार तत्वावर पालिकेची परिवहन सेवा हाताळली होती.Sakal

उल्हासनगर : महानगरपालिकेची ठप्प पडलेली परिवहन सेवा अखेर 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर उल्हासनगरातील रस्त्यावर 5 बस धावू लागल्या असून डॉ.शिंदे,आयुक्त अजीज शेख यांच्यासह मान्यवरांनी बसमधील प्रवासाचा आनंद लुटला आहे.

केष्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी 2009 ते 2014 या कालावधीत करार तत्वावर पालिकेची परिवहन सेवा हाताळली होती. मात्र सातत्याने पेट्रोलची दरवाढ होत असताना वारंवार प्रवासी भाड्यात भाडेवाढ करून देण्याच्या मागणीकडे डोळेझाकपणा करण्यात येत असल्याने गेमनानी यांनी परिवहन सेवेचा गाशा गुंडाळला होता.

2014 पासून महानगरपालिकेने अनेकदा परिवहन सेवा सुरू करण्याच्या निविदा प्रक्रिया प्रक्रिया हाताळल्या.पण त्यासाठी कुणीही कंत्राटदार पुढे येत नव्हता.अशावेळी अजीज शेख यांनी आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यावर त्यांनी परिवहन उपआयुक्त अशोक नाईकवाडे व वाहन व्यवस्थापक विनोद केणे यांना परिवहन सेवेच्या निविदेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.

त्याचे फलित मिळाले आणि पुण्याच्या कंपनीला परिवहन सेवा हाताळण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले.कंपनीने प्रथम पुण्यातील भोसरीमध्ये 20 बसेस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

त्यापैकी धावण्यासाठी सज्ज असलेल्या 5 बसेस उल्हासनगरात दाखल झाल्या होत्या.त्यासाठी मंत्रालयातून बसेसचे तिकीट दर निश्चित करणे आवश्यक होते.त्यानुसार मंत्रालयात मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची बैठक अपर मुख्य सचिव (परिवहन)यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्यात बसच्या तिकीट दरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यावर रविवारी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून परिवहन सेवेचे लोकार्पण केले.यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,आमदार डॉ.बालाजी किणीकर,आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,

उपजिल्हाप्रमुख अरुण आशान,महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी,शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज,रमेश चव्हाण,संघटक नाना बागुल,भाजपचे पदाधिकारी प्रकाश माखीजा,जमनू पुरस्वानी,राजेश वधारीया,डॉ.प्रकाश नाथानी,

कपिल अडसूळ,माजी परिवहन समिती सभापती सुभाष तानवडे,दिनेश पंजाबी,वाहन व्यवस्थापक विनोद केणे,शिवसेना महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली,माजी नगरसेविका अर्चना करणकाळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com