
मुंबई : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला त्यांच्या तीन अधिकार्यांना क्रू ड्यूटी शेड्यूल आणि रोस्टरसंबंधीत जबाबदार्यांवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश १२ जून रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर देण्यात आला आहे. या दुर्घटनेत २७० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.