BMC आयुक्तांच्या सहीनंतर नेस्को कोविड सेंटरमधील कोट्यवधीचं सामना काढलं बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई: नेस्को कोविड सेंटरमधील कोट्यवधीचं सामना काढलं बाहेर

मुंबई: नेस्को कोविड सेंटरमधील कोट्यवधीचं सामना काढलं बाहेर

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: नेस्कोतील जम्बो कोविड (Nesco covid center) केअर सेंटरच्या फेज २ मधील कोट्यवधी रुपयांचे सामान हॉस्पिटल बाहेर बळजबरीने काढून टाकण्यास सुरूवात झाली आहे. काल आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सेंटर बंद करण्याच्या फाईलवर सही केल्यानंतर लगेच आज नेस्कोकडून बळजबरीने ताबा घेण्यास सुरवात झाली आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत (Third wave) अजून साशंकता असताना नेस्कोच्या दबावापुढं झुकत मुंबई महापालिकेकडून (BMC) जम्बो कोविड केअर सेंटर बंद करण्यात आलं आहे.

नेस्को कंपनीच्या दबावास बळी पडून सुमारे १० कोटी रूपये खर्चून उभारलेले नेस्को कोवीड सेंटरचे फेज २ बंद करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. राज्य टास्क फोर्सने कोणतेही जम्बो कोवीड केअर सेंटर्स बंद करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी गोरेगाव पूर्व इथल्या नेस्कोतील ई हॉलमध्ये दीड हजार बेडचे जम्बो कोवीड सेंटर उभं केलंय. ज्यात १ हजार बेड ऑक्सिजनयुक्त आहेत.

हेही वाचा: 'पुनीत यांना श्रद्धांजली वाहिली की अ‍ॅपचं प्रमोशन केलं?'; रजनीकांत ट्रोल

जुलै २०२१ मध्ये प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरूवात झाली होती. यातील ७०० बेड हे ऑक्सिजन पाईप लाईनने जोडण्यात आलेत. यासाठी १३ Kl क्षमतेची नवीन टाकी काही दिवसांपूर्वी येथे बसवण्यात आली असून २५० रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन निर्माण करणारे पाच प्रकल्प बसवून तयार करण्यात आलेत. नेस्को लिमिटेड कंपनीकडे प्रचंड मोठा एफ हॉल तसंच आणखी दोन हॉल व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. तरीही फेज २ चे कोवीड सेंटरचा हॉल कंपनी ताब्यात घेत आहे

loading image
go to top