esakal | बायपास, अँजिओप्लास्टी झालेल्या निवृत्त पोलिसाची कोरोनावर यशस्वी मात

बोलून बातमी शोधा

अशोक जोशी
बायपास, अँजिओप्लास्टी झालेल्या निवृत्त पोलिसाची कोरोनावर यशस्वी मात
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना विषाणूनं आज जगभरातल्या अनेकांची झोप उडवली आहे.  मुंबई व लगतच्या शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशासह राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे.  कोरोनाची लागण ही वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना लवकर होते, असे वारंवार सांगितलं जात आहे. वृद्ध व्यक्तींना किंवा लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला त्या आजारातून वाचवणे कठीण असल्याचेही डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे.

हेही वाचा: मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनाने निधन

मात्र, कल्याणच्या 70 वर्षीय अशोक जोशी यांनी मोठ्या हिमतीने कोरोनाचा सामना करून घरी परतले आहेत. अशोक जोशी हे निवृत्त पोलिस कर्मचारी असून ते कल्याण पश्चिम खडकपाडा इथे एकत्र कुटुंबात राहतात. जोशी यांच्यावर 2003 साली बायपास सर्जरी झाली होती. तसेच, 2015 मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली.

हेही वाचा: वसईत ख्रिश्चन धर्मीयांकडून केलं जातंय प्रेताचं दहन

मार्च महिन्यामध्ये जोशी यांच्या घरामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, घरामध्ये एकूण 14 माणसे कोरोना पॉझिटिव्ह आले. अशोक जोशी यांचे वय आणि आधीचा इतिहास पाहता त्यांच्या मुलाने त्यांना कल्याण येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करून उपचार सुरु केले.

स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक, जेष्ठ फिजिशियन व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ यांनी सांगितले की, "अशोक जोशी जेंव्हा रुग्णालयात भरती झाले तेंव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. परंतु या आजाराबाबत भीती अजिबात नव्हती.

त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहता आम्ही त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले व या उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन आठवड्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे." "यापुढे कोणीही कोरोनाला घाबरू नये, मी या वयात कोरोनावर मात केली आहे" अशी भावना कोरोना मुक्त झालेल्या 70 वर्षीय अशोक जोशी यांनी बोलून दाखवली.