चलो कोकण! मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे सोडणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या गाड्यांचा तपशील

चलो कोकण! मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे सोडणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या गाड्यांचा तपशील

मुंबईः कोरोनामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक चाकरमान्यांची निराशा झाली होती. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेनं शुक्रवारी विशेष गाड्यांची घोषणा केली.  मध्य रेल्वे कोकणासाठी १६२ विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. १५ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून या गाड्यांसाठी बुकिंग सुरू होणार असून पहिली गाडी देखील आजच  सुटणार आहे. त्यानंतर मध्य रेल्वेच्या निर्णयानंतर पश्चिम रेल्वेनंही गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी नक्कीच दिलासादायक बातमी आहे.

गणपतीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची कोंडी दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीने या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 

जाणून घ्या गाड्यांचा तपशील 

  • पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडी रोड आणि कुडाळ स्टेशनपर्यंत गणपती स्पेशल ट्रेन धावतील. 
  • एकूण ५ विशेष ट्रेन सोडण्यात येणार असून २० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
  • दोन गणपती स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड, 
  • दोन गणपती स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनस ते सावंतवाडी रोड 
  • एक ट्रेन वांद्रे टर्मिनस ते कुडाळ दरम्यान धावेल.
  • या सर्व गाड्यांना विशेष प्रवासभाडे द्यावे लागणार
  • या गाड्यांचे आरक्षण आजपासून खुले होणार
  • मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्या बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा या ठिकाणी थांबा घेत कोकणाकडे रवाना होतील.
  • या ट्रेन आठवड्यातून दोनदा धावतील.
  • १७ ते ३० ऑगस्ट या दरम्यान या २० फेऱ्या होणार आहेत.

मध्य रेल्वेच्या स्पेशल गाड्यांचं बुकिंग आजपासून सुरु होत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरी, कुडाळ व सावंतवाडीसाठी या गाड्या सुटणार आहेत.  १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, ८२ अप तर ८२ डाउन अशा एकूण १६२ ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच या ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. www.irctc.co.in येथे  बुक करू शकता.

After central railway western railway announce run 20 special trains kokan ganpati festival

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com