नवी मुंबईतली कोरोनास्थिती चिंताजनक, जाणून घ्या सविस्तर

पूजा विचारे
Saturday, 15 August 2020

नवी मुंबई शहरात कोरोनानं थैमानं घातलं आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या आता  २० हजार पार झाली आहे.

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असताना दुसरीकडे मुंबईला लागून असलेलं नवी मुंबई शहरात कोरोनानं थैमानं घातलं आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या आता  २० हजार पार झाली आहे. शुक्रवारी शहरात ३७३ नवे कोरोनाबधित रुग्ण आढळलेत. नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत चालली आहे. 

शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. शुक्रवारी ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. वाढत्या संसर्गामुळे शहरात कोरोनाबाधितांची  एकूण संख्या २०,१७३ झाली आहे. 

शुक्रवारी बेलापूर ७५, नेरुळ ५६, वाशी ३७, तुर्भे ३१, कोपरखैरणे ५०, घणसोली ६३, ऐरोली ४९, दिघामध्ये १२ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ५०, नेरुळ ७५, वाशी ३१, तुर्भे ३१, कोपरखैरणे २८, घणसोली ३५, ऐरोली ५० आणि दिघामधील ७ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६०६७ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ४९९ झाला आहे.

हेही वाचाः चाकरमान्यांचा गणेशोत्सव यंदा मुंबईतच; ई-पाससाठी पोलिसांकडे केवळ ४ हजार अर्ज

शहरात आतापर्यंत एकूण  १६,०६७ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर शहरात ३,५६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय. शहरात आतापर्यंत ४७ ,०६७ नागरीकांच्या अँटीजन चाचण्या करण्यात आल्यात. एका दिवसात तीन हजार कोरोना चाचण्या होताहेत. कोरोनामुक्तीचा दर ८० टक्के झाला आहे असून नवी मुंबईत एकूण ८५,८५६ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने प्रतिजन तपासण्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढविण्यात आल्याने शहरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. 

शहरातील कोरोना रुग्णाला एका कॉलवरून खाटा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. यासाठी ऑनलाइन माहितीफलक तयार केला जात असल्याचंही समजतंय.

अधिक वाचाः  कोकणात जाण्यासाठी दोन दिवसांत केवळ तीनच प्रवाशांचे आरक्षण; कोरोना चाचणीमुळे चाकमान्यांची एसटीकडे पाठ

गेल्याच आठवड्यात नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅब सुरु करण्यात आली आहे. तसंच महापालिका हद्दीतील गंभीर रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध व्हावेत यासाठी नेरुळ सेक्टर 5 येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत 200 आयसीयू बेड आणि 80 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्याचा करार करण्यात आलाय.

Navi Mumbai covid 19 case rise total count till 20 thousand


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai covid 19 case rise total count till 20 thousand