छठपूजेनंतर नदीपात्रातील भराव हटवण्यास सुरुवात, खर्च आयोजकांकडून वसूल होणार

Badlapur Chhath Puja: छठपूजेनंतर नदीपात्रातील भराव हटवण्यास सुरुवात झाली आहे. भराव हटवण्याचा खर्च संबंधित आयोजकांकडून वसूल केला जाणार आहे.
Ulhas riverbed cleanup

Ulhas riverbed cleanup

ESakal

Updated on: 

बदलापूर : उल्हास नदीपात्रात छठपूजेच्या आयोजनासाठी करण्यात आलेला मातीचा भराव हटवण्यास सोमवारी (ता. १६) सुरुवात झाली. जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने सकाळपासून माती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. भराव करण्यापासून तो हटवण्यापर्यंतचा संपूर्ण खर्च तसेच दंडाची रक्कम संबंधित आयोजकांकडून वसूल करण्याची भूमिका कुळगाव-बदलापूर नगर परिषद प्रशासनाने घेतली आहे.

Loading content, please wait...