esakal | मुख्यमंत्री अभ्यास करुन बोलतात- जितेंद्र आव्हाड

बोलून बातमी शोधा

jitendra awhad.jpg
मुख्यमंत्री अभ्यास करुन बोलतात- जितेंद्र आव्हाड
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्यात आणखी पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील मंत्र्यांकडूनच तसे संकेत दिले जात आहेत. कोरोनाला पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन वाढवा असे काही मंत्र्यांचे मत आहे. मुंबईत लॉकडाउनमुळे रुग्ण संख्या कमी झाली. परिस्थिती नियंत्रणात आली, असे सरकारमधील मंत्र्यांकडून दावे केले जात आहेत.

पण विरोधक मात्र चाचण्यांची संख्या घटवल्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचा आरोप करतायत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र सुद्धा लिहिले आहे. त्यात त्यांनी जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला. व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था नव्हती. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली असती. त्यामुळे लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला.

हेही वाचा: मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे? पत्रकाराच्या प्रश्नावर राजेश टोपेंनी दिलं उत्तर

आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात मोफत लसीकरणाबरोबरच लॉकडाउन बद्दल चर्चा झाली. जितेंद्र आव्हाड यांना लॉकडाउन वाढवण्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मत काय? असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, "मुख्यमंत्री उदहारण देऊन बोलतात. मुख्यमंत्री संख्येवर बोलतात. त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. ते अभ्यास करुन आलेले असतात." "त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे. प्रत्येक घरात एक माणुसा गेला असेल, काही ठिकाणी एकाच घरातील दोन ते तीन माणसांचे निधन झाले आहे. त्या घरची मानसिक स्थिती कशी असेल?. पुढची तीन ते चार वर्ष त्या घरची मानसिक स्थिती खराब असेल" असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड ठाकरे सरकारमध्ये मंत्री असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत.