esakal | मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे? पत्रकाराच्या प्रश्नावर राजेश टोपेंनी दिलं उत्तर

बोलून बातमी शोधा

Rajesh-Tope
मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे? पत्रकाराच्या प्रश्नावर राजेश टोपेंनी दिलं उत्तर
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: देशात येत्या एक मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाचा नवीन टप्पा सुरु होणार आहे. पण महाराष्ट्र सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण लांबवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात १ मे पासून १८ वर्षापुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मिळणार नाही. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजेश टोपेंना यावेळी एका पत्रकाराने देशाच्या अन्य भागात १ मे ला लसीकरण सुरु होणार आहे, मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे? असा प्रश्न विचारला.

त्यावर राजेश टोपेंनी "१ मे पासून देशातील कुठलही राज्य १८ ते ४४ वयोगटासाठी पूर्णपणे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करेल असं वाटत नाही. लसींचा पुरवठा करणाऱ्या फक्त दोन कंपन्या आहेत. केंद्र सरकारने आधीच त्यांच्याकडे आगाऊ लसींची ऑर्डर दिली आहे. या दोन कंपन्या महाराष्ट्रालाही लस पुरवठा करतील, पण तो पुरवठा नतंर होईल" असे उत्तर टोपेंनी दिले.

हेही वाचा: मुंबईत मोफत मिळणार ऑक्सिजन, कसं ते समजून घ्या...

"१८ वर्षापुढील वयोगटासाठी लसीकरण सुरु करुन नंतर दोन-चार दिवसांनी ते बंद करणं योग्य नाही. त्यात सातत्य राहिलं पाहिजे. ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. १ मे रोजी लसीकरण सुरु करण्यात अडचण नाही. दोन-चार लाख लसीचे डोस मिळतील पण नंतर लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पुन्हा लसीकरण बंद करावे लागेल. ४५ वर्षापुढील वयोगटासाठी लसीकरणाच्या कार्यक्रमातून हे दिसून आलय" असं टोपे म्हणाले.