विकेंन्ड स्पेशल आनंदाची बातमी खास मुंबईकरांसाठी, जाणून घ्या

विकेंन्ड स्पेशल आनंदाची बातमी खास मुंबईकरांसाठी, जाणून घ्या

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं. राज्यासह मुंबईत सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव पाहायला मिळाला. मुंबई शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा दररोजचा आकडा नवा उच्चांक गाठताना दिसायचा. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं विविध पातळीवर प्रयत्न केले. दरम्यान आता मुंबई महापालिकेनं घेतलेल्या अथक प्रयत्नातून कोरोना नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. मार्चपासून मुंबईत शिरकाव केलेला कोरोना संसर्ग आता नियंत्रणात येतोय. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेनं प्रमुख वैद्यकीय रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये तसंच दवाखान्यांची फेररचना करण्याच्या दृष्टीने आखणी सुरू केली आहे. 

कोरोना रुग्णांसह इतर व्याधी तसेच पावसाळी आजारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवरही पूर्वीप्रमाणेच उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज होणार असल्याची माहिती समोर येतेय. कोरोनामुळे ज्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या किंवा रखडल्या, त्याही पूर्वीप्रमाणे टप्प्याटप्याने सुरू करण्यात येणारेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून ही रचना पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं आखणी सुरू झालीय.

येत्या आठवड्यापासून पालिकेच्या चार मुख्य रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना आणि कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठी वैद्यकीय उपचार देण्यात येतील. कोरोनाच्या संकट काळात नायर रुग्णालयाचे रूपांतर हे पूर्णपणे कोरोना रुग्णालयामध्ये करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी कोरोनाव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे विभाग सुरू करण्यात येणारेत. 

उपनगरीय १६ रुग्णालयांपैकी एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येतील. तर इतर सहा रुग्णालये कोरोनासह अन्य आजारांसाठी तर उर्वरीत नऊ उपनगरीय रुग्णालयांमध्ये कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठी रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे, पालिकेच्या महत्त्वाच्या चारही रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणारेय. 

कोणत्या आजारांचे शस्त्रक्रिया विभाग पहिल्या टप्प्यात सुरू करायचे, यासंदर्भातील कृती आराखडा रुग्णालयांनी पालिका प्रशासनाकडे द्यायचा आहे. डोळ्यांच्या उपचारपद्धतीही येत्या दोन दिवसात सुरू होतील. कान, नाक, घसा रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना घरी सोडल्यानंतर दोन दिवस रुग्णालय बंद ठेवली जातील आणि त्यानंतर पुन्हा ती सुरू करण्यात येतील.

मुंबई महापालिकेनं ज्याप्रमाणे कोरोना नियंत्रणात आणला त्यामुळे महापालिकेचं सर्व स्तरातून कौतुक केलं आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेनं चांगलीच कंबर कसली आहे. पालिकेनं सुरुवातीलाच एक प्रोग्राम हाती घेतला आणि त्यानंतर त्यावर काम करण्यास सुरुवात केली.

after dharavi mumbai bmc control corona virus in city

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com