esakal | "आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत ! 
sakal

बोलून बातमी शोधा

"आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत ! 

"जी पार्टी चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट करते त्या पार्टीत कोण राहील." - जयसिंग गायकवाड 

"आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत ! 

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील हेवी वेट नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आज पुन्हा एका भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश पार पडला. भाजपचे बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज अधिकृतरीत्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर भारतीय जनता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी वाढत आहे. भाजपचे जुने नेते फडणवीस यांच्या नेतृत्वात नाराज असल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. हेच कारण देत जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत जाहीर पक्षप्रवेश पार पडला. भारतीय जनता पक्षात सध्या मनमानी सुरू असून आयाराम नेत्यांवर सर्वाधिक भरोसा असल्याची टीका गायकवाड यांनी केली होती. 

महत्त्वाची बातमी : प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा भाईंदरमध्ये साकारणार 'वारकरी भवन'

आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना जयसिंग गायकवाड म्हणालेत की, "जी पार्टी चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट करते त्या पार्टीत कोण राहील. राष्ट्रवादी आणि तुम्हाला सोडल्याचा मला पश्चाताप होत होता. खुखार आतंकवाद्यांनी भाजपचा ताबा घेतला आहे", अशी जहरी टीका जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी केली आहे.

"भाजपात नितीन गडकरी यांचीही अवस्था फार चांगली नाही, त्यांचाही कोंडमारा होतो. अशा पक्षात राहणं शक्य नाही. गोडावूनमधून बाहेर आल्यावर मोकळा श्वास घेतात तसा श्वास मी आता घेतोय. दीड तप मी या पार्टीची सेवा केली आणि वसंतराव काळे यांच्या विरुद्ध मला उभं केलं. निवडून येणार की नाही यावर मला तू दारू प्यायला आहेस का असं विचारलं. मी आता या लोकांसोबत राहू शकत नाही. आता यांचं सगळं मी बाहेर काढणार. आज मी राष्ट्रवादीत आलोय, मला दिलेली कोणतीही जबाबदारी मी पार पाडेन. आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी. राष्ट्रवादी कानाकोपर्यात कशी जाईल यावर मी कारेन." असं जयसिंग गायकवाड म्हणालेत.  

महत्त्वाची बातमी : समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश

दरम्यान, यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणालेत की, जयसिंग गायकवाड भारतीय जनता पक्षात गेले आणि भारतीय जनता पक्षातून काम करत असताना गेली काही वर्ष त्यांच्या लक्षात आले आहे की भारतीय जनता पक्ष हा बीड जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हिताचे काम करत नाही. म्हणून त्यांनी स्वतःहून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादी मध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

after eknath khadse ex MP of BJP jaysingrao gayakwad joins NCP big blow to BJP

loading image
go to top