esakal | फडणवीस-राऊत बैठकीनंतर, शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीस-राऊत बैठकीनंतर, शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देखील बैठक पार पडली आहे. या बैठकीबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे

फडणवीस-राऊत बैठकीनंतर, शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - शनिवारी सायंकाळी राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या बैठकीची राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली होती. शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या बैठकीवर अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिक्रीया देखील आल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देखील बैठक पार पडली आहे. या बैठकीबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीचा विषय राजकारणात तापलेला असताना, त्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेली बैठक चर्चेचा विषय ठरत आहे. ही बैठक मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर साधारण तासभर पार पडली असल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही बड्या नेत्यांमध्ये नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली. याची माहिती अद्यापही कळू शकलेली नाही. परंतु फडणवीस-राऊत यांच्या बैठकीनंतर झालेल्या या बड्या नेत्यांच्या बैठकीमुळे राजकीय चर्चा आणि तर्कवितर्कांना उधान आले आहे.