मुंबई पालिकेच्या 'या' रुग्णालयात लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड OPD

भाग्यश्री भुवड
Wednesday, 12 August 2020

पालिकेच्या प्रमुख केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांसाठीही विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात येणार आहे. 

मुंबई: कोरोनावर मात केलेल्या रुग्णांवर दिसून येणारे तत्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम दूर करण्यासाठी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाने 'पोस्ट-कोविड-19 ओपीडी' सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पालिकेच्या प्रमुख केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांसाठीही विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात येणार आहे. 

दरम्यान, लवकरच केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात ही पोस्ट कोविड सुरु करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 
कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा अनेक गंभीर समस्या उद्भवत आहेत. अशक्तपणा, फुप्फुसाचा त्रास, श्वसनाचा त्रास होत आहे. अशा रुग्णांवर आधीच केईएम रुग्णालयात उपचार सुरु झालेत. शिवाय, सायन आणि नायरमध्येही कोरोना रुग्ण बरा होऊन गेल्यानंतर त्याची विचारपूस केली जाते. त्यांना संपर्क करुन त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत याची चौकशी केली जाते. तसंच, सध्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पल्मनरी फायब्रोसिसचा धोका होऊ लागला आहे. असे रुग्ण ही दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, अशा रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. 

हेही वाचाः मुंबई पालिका आयुक्तांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतला 'हा' निर्णय

या रुग्णांवर होणार उपचार

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना काही दिवसांनंतर पुन्हा एकदा अशक्तपणा, फुप्फुसाचा त्रास, श्वसनाचा त्रास उद्भवत आहेत. या रुग्णांवर ओपिडीत उपचार केले जाणार आहेत.

कोविड रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना वॉर रूम मधून संपर्क केला जात आहे. फक्त अशी वेगळी ओपिडी सुरु नव्हती. ती येत्या आठवड्यात सुरु केली जाणार आहे. रुग्णांना प्लाझ्मा दानासाठी ही सांगितले जात आहे. त्यांचे समुपदेशन केले जाते. सायन, केईएम आणि नायरमध्ये ही ओपीडी सुरु केली जाईल. पोस्ट कोविड समुपदेशनासारखे उपचार सुरु आहेत. पण आता वेगळी ओपीडी सुरु होईल, असं नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल, यांनी सांगितलं आहे. 

अधिक वाचाः 'मुख्यमंत्री, तुमच्या मुलानं पदाचा दुरुपयोग केला', नीलेश राणेंचा आरोप

कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना अतिजोखमीचा आजार झाला आहे. त्यांच्यावर आधीच उपचार सुरु झाले आहेत. रुग्णालयात ओपीडी सुरु आधीपासुनच सुरु आहे. मात्र, वेगळा विभाग लवकरच सुरु केला जाईल. येत्या आठवड्यात हा विभाग सुरु होईल, असं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी म्हटलं आहे.

(संपादनः पूजा विचारे)

after Fortis Hospital civic body launched post-COVID 19 OPD


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after Fortis Hospital civic body launched post-COVID 19 OPD