मुंबई पालिका आयुक्तांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतला 'हा' निर्णय

मुंबई पालिका आयुक्तांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतला 'हा' निर्णय

मुंबईः  राजकीय नेते, उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासोबत आपण त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी बाऊन्सर पाहिले असतील. आता मात्र आयएएस अधिकाऱ्यांसोबतही बाऊन्सर दिसणार आहेत. मुंबई पालिकेच्या सरकारी सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त आता खासगी बाऊन्सर देखील सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.  मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःसाठी आणि पालिकेतील इतर चार अतिरिक्त आयुक्तांच्या सुरक्षेसाठी दहा बाऊन्सर नेमले आहेत. पालिकेने घेतलेल्या ईगल सिक्युरिटी सर्व्हिसमधून हे बाऊन्सर घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी स्वतःसाठी चार आणि चार अतिरिक्त आयुक्तांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी एक, तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागासाठी दोन बाऊन्सर नेमलेत. पालिकेने रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी ईगल सिक्युरिटी कंपनीचे सुरक्षारक्षक मोठ्या प्रमाणात घेतलेत.  त्यातील दहा जणांना आयुक्तांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलंय. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही स्वतःसाठी खासगी बाऊन्सर ठेवलेत. ती त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था आहे. दरम्यान आयुक्तांनी ठेवलेल्या बाऊन्सरचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून होणार आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेमण्यात आलेल्या प्रत्येक बाऊन्सरसाठी मुंबई पालिका ३० ते ४० हजार रुपये मोजणार असल्याचं म्हटलं जात आहे.

तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे मुंबईत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे मे महिन्यात त्यांच्या जागी इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली. चहल यांनी आयुक्तपदाचा कारभार स्विकारल्यानंतर कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यानंतर त्यांच्या कामाचा निकाल मुंबईत दिसूनही आला. मुंबईत सद्यपरिस्थिती कोरोना नियंत्रणात आला आहे.

दरम्यान पालिका आयुक्तांना याबाबत विचारलं असता, त्यांनी खासगी बाऊन्सर नेमले नसल्याचं म्हटलं आहे. पालिकेने नेमलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांमधून दहा जणांना घेण्यात आलं असून मला सुरक्षेची कधीच गरज भासत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तशीच परिस्थिती असती तर पोलिस आयुक्तांना सांगून पोलिस संरक्षण घेतले असते. मी स्पोर्टस्मन आहे. माझे वडील सैन्य दलात होते. त्यामुळे मला कडक शिस्तीची आवड आहे. सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेला व्यक्ती तरतरीत आणि स्मार्ट दिसला पाहिजे. त्यामुळे साध्या कपड्यातील सुरक्षा रक्षकांना बाऊन्सरसारखा गणवेश देऊन नेमण्यात आलं असून त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नाही. तसंच खासगी सुरक्षा रक्षकांसोबत पालिकेचे सुरक्षारक्षकही राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

BMC chief iqbal singh chahal appoint Special bouncer for safety

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com