
ST Bus Travel
ESakal
अलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर आता चाकरमान्यांना वेध लागले आहेत ते परतीच्या प्रवासाचे. परतीचा प्रवास करताना चाकरमान्यांना कोणताच त्रास होऊ नये यासाठी एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधून एसटीने अतिरिक्त बसची व्यवस्था केली आहे. ३ सप्टेंबरला ५२५, तर ४ सप्टेंबरला १२५ अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या. विसर्जनानंतर बुधवारी (ता.३) सकाळपासूनच अलिबाग एसटी आगारात मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.