वीज कर्मचाऱ्यांचा आजचा संप मागे, उर्जामंत्र्यांच्या बैठकीनंतर मध्यरात्री संप पुढे ढकलला

तेजस वाघमारे
Saturday, 14 November 2020

वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार बोनस देण्याची घोषणा केल्यानंतर रात्री 12 वाजता ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली.

मुंबई, ता. 14 : वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार बोनस देण्याची घोषणा केल्यानंतर रात्री 12 वाजता ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी वीज कामगार संघटनांना केलेल्या आवाहनानंतर एक दिवसीय संप पुढे ढकलण्याचा निर्णय संघटनांनी मध्यरात्री घेतला.

वीज कंपन्यांनी कामगारांना बोनस देता येणार नसल्याची भूमिका घेतल्याने सर्व संघटनांनी एकत्रित येत एक दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला होता. यानुसार 14 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपासून हा संप सुरू होउन रविवार 15 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत संप चालेल, असे कामगार संघटनांनी जाहीर केले होते.

महत्त्वाची बातमी : विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंच्या खांद्यावर पक्षाने टाकली मोठी जबाबदारी

मात्र कामगार संपावर जाण्याच्या काही तास अगोदरच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कामगारांना तत्वतः बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे दिवाळीच्या कालावधीत वीज ग्राहकांना त्रास होईल, असे काम करू नये असे आवाहनही राऊत यांनी केले होते. त्यानंतर कामगार,अभिंयते व अधिकारी संघटना पदाधिकारी यांची रात्री 12 वाजता आॕनलाईन गुगल मिटवर बैठक आयोजित केली. या बैठकीत राऊत यांनी संघटनांना संप मागे घेण्याची विनंती केली.

या बैठकीतील चर्चेनंतर वीज कामगार संघटनांनी तृर्त संप पूढे ढकल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.कृष्णा भोयर यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

after meeting with energy minister nitin raut electricity company workers rolls back the strike


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after meeting with energy minister nitin raut electricity company workers rolls back the strike